ठाणे महापौर व्हर्च्युअल मॅरेथॉन स्पर्धेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोविडच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात प्रथमच ठाणे महापौर व्हर्च्युअल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. नव्यानेच आयोजित झालेल्या आगळ्या वेगळ्या स्पर्धेस ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून स्पर्धा यशस्वी केली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे संपूर्ण महाराष्ट्राला आकर्षण असते. परंतु गेले दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होवू शकली नाही. या परंपरेत खंड पडू नये यादृष्टीने महापौरांच्या संकल्पनेतून व्हर्च्युअल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. जेणेकरुन स्पर्धकांना यामध्ये सहभागी नोंदविता येईल. डिकॅथलॉन आणि फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून व्हर्च्युअल मॅरेथॉन चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत स्पर्धेकांनी डिकॅथलॉनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या ॲपवर नोंदणी करुन स्पर्धकांना आहेत त्याच ठिकाणी धावण्याची संधी उपलब्ध करुन दिली होती. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 1900 स्पर्धकांना आपला सहभाग नोंदविला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेतील चार गटातील स्पर्धकांना प्रातिनिधीक स्वरुपात ठाणे महापालिकेच्या वतीने पदक तर डिकॅथॅलॉन आणि फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने ई-प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत विविध क्षेत्रातील स्पर्धक तसेच विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading