ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत यापुढे प्रथम क्रमांक विजेत्या महिला स्पर्धकालाही देणार चांदीची गदा

ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या महिला स्पर्धकांनाही यापुढे चांदीची गदा देण्यात येणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेची अंमलबजावणी प्रशासनाने केली असून 2019-20 या कालावधीत घेण्यात आलेल्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेतील महिला खुल्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या कोल्हापूरच्या सृष्टी भोसले हिला महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते नुकतीच चांदीची गदा, शाल, श्रीफळ देवून गौरवण्यात करण्यात आले. यापूर्वी ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या पुरुष स्पर्धकांना चांदीची गदा देण्यात येत होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला विजेत्यांनाही चांदीची गदा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार यापुढे आता कुस्ती स्पर्धेतील महिला विजेत्यांनाही चांदीची गदा देण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading