ठाणे महापालिके तर्फेही शिवजयंती मोठ्या उत्सवाने साजरी

ठाणे महापालिके तर्फेही शिवजयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली.
शिवसेनेचा मोठया प्रमाणावर सहभाग असल्याने तिथी नुसार असलेली शिवजयंती मोठया उत्साहात साजरी झाली. ढोल-ताशांचा गजर, झांज पथकांचा कडकडाट, शिवचरित्रावर आधारीत जिवंत देखावे, आकर्षक चित्ररथ आणि लेझीमच्या तालावर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठया उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाली. यानंतर मासुंदा तलावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयास पुष्पहार अर्पण केल्यानंतर पालखीमधील शिव प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल-ताशांचा गजर, बँड पथके, झांज पथके, दांडपट्टा फिरवणारे साहसी तरुण, जिवंत देखावे अशी विविधरंगी मिरवणूक ठाणेकर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. मासुंदा तलावापासून सुरू होऊन ही मिरवणूक अग्यारी लेन, टेंभीनाका, भवानी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, सिध्दीविनायक मंदिराजवळून जांभळीनाका, अहिल्याबाई होळकर पुतळ्यामार्गे गडकरी रंगायतन इथे विसर्जित झाली. यंदा करोना विषयक कोणतेही निर्बंध नसल्यानं शिवजयंती उत्सहात साजरी झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading