ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित सांस्कृतिक महोत्सव उत्साहात

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. महापालिकेच्या १२० शाळांमध्ये घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांना शालोपयोगी वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या. या स्पर्धेत नृत्य आणि नाट्य अशा दोन विभागात स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पहिली ते पाचवी नृत्य विभागात शाळा क्रमांक १०७ ला प्रथम, शाळा क्रमांक ४४ ला द्वितीय, शाळा क्रमांक ४१ ला तृतीय क्रमांक देण्यात आला. उत्कृष्ट कलाकार म्हणून हर्षद खेताडे तर उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून काजल सिंगला पुरस्कार देण्यात आला. सहावी ते आठवीच्या विभागात शाळा क्रमांक ३३ ला प्रथम, शाळा क्रमांक २३ ला द्वितीय तर शाळा क्रमांक ६० ला तृतीय क्रमांक देण्यात आला. उत्कृष्ट कलाकार म्हणून समीर तनोजिया आणि सलोनी निकम तर उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सारिका सावंत, अनघा जाधव यांना गौरवण्यात आलं. सातवी ते आठवीच्या विभागात शाळा क्रमांक १४ ला प्रथम, शाळा क्रमांक १२४ ला द्वितीय तर शाळा क्रमांक ४८ ला तृतीय क्रमांकानं गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading