आनंदनगर आगार येथे प्रवासी पास वितरण केंद्र

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्या घोडबंदर मार्गावरील प्रवाशांच्या मागणीनुसार आनंदनगर आगार येथे प्रवासी पास वितरण केंद्र 12 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध करण्यात आलेल्‌या या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. सद्यस्थितीत परिवहन सेवेचे शिवाजीनगर येथे पास वितरण केंद्र असून या ठिकाणाहून प्रवासी पास, विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, दिव्यांग ओळखपत्र, स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र इत्यादी सवलतीचे पास देण्यात येतात. परंतु या केंद्रावर जाण्यास घोडबंदर मार्गावरील प्रवाशांना गैरसोयीचे होत असल्याने घोडबंदर मार्गावर पास वितरण केंद्र सुरू करणेबाबत सातत्याने प्रवाशांकडून मागणी होत होती. या मागणीनुसार 12 सप्टेंबरपासून आनंदनगर येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पास वितरण केंद्र सुरू करण्यात येत आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading