ठाणे महापालिकेच्या नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

कोविडच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी महापालिकेची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. नवरात्रौत्सव साध्या पध्दतीनं साजरा करण्याच्या अनुषंगाने मूर्तीची सजावट करावी, मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट तर घरगुती देवीची मूर्ती २ फूट असावी. नवरात्रौत्सवासाठी वर्गणी स्वच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा, गरबा-दांडिया कार्यक्रम आयोजित करू नयेत तसंच आरोग्य विषयक शिबीरं घ्यावीत, दर्शनाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून द्यावी, मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी, मंडपांमध्ये खाद्यपदार्थाची व्यवस्था करण्यास मनाई राहील. देवीच्या आगमन विसर्जनाच्या मिरवणुका काढू नयेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading