ठाणे महापालिकेच्या कर सवलतीस मोठा प्रतिसाद- चार महिन्यात ३४५ कोटींची वसुली

मालमत्ता कर सवलतीचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा यासाठी दिलेल्या मुदतवाढीस करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून जुलै अखेर 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे. ठाणेकर करदात्यांना पहिल्या सहामाही सोबत दुसऱ्या सहामाहीचा सामान्य कर भरण्याकरिता 16 जून ते 15 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीचा फायदा ठाणेकरांनी घेतला असून जुलै अखेर 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे. मालमत्ता कर सवलतीचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा यासाठी 15 ते 31 जुलै पर्यत 4% सवलत देण्यात आली होती. या सवलतीस दिलेल्या कालावधीत मागील वर्षी 260 कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला होता. यावर्षी मालमत्ता कराकरिता 770 कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट असून चार महिन्यातच त्यापैकी 45 टक्के वसुली म्हणजेच 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे. ज्या करदात्यांनी अद्यापपर्यत मागील थकबाकी अथवा चालू सहामाहीचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला नाही अशा करदात्यांनी मालमत्ता कर वसुली कारवाई अंतर्गत अप्रिय घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त जी.डी. गोदेपुरे यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading