ठाणे महापालिकेचे शहरविकास अधिकारी प्रमोद निंबाळकर यांना मातृशोक

ठाणे महापालिकेचे शहरविकास अधिकारी प्रमोद निंबाळकर यांना काल मातृशोक झाला.ठाणे महानगर पालिकेच्या शहरविकास विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रमोद निंबाळकर यांच्या मातोश्री इंदुमती निंबाळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. दोन महिन्यापूर्वीच त्यांचे वडील अण्णा निबाळकर यांचे निधन झाले होते. इंदुमती निंबाळकर या काल परवा जीवदानी आईचे दर्शन करून परतल्या होत्या. अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याने निंबाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मातोश्रींच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी कोपरीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading