ठाणे महापालिकेचा 4 लाख उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

ठाणे महापालिकेने आज 4 लाखांचा उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. ही माहिती महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी केली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्या टप्प्याने देण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात ४ लाख २ हजार ४०८ इतका उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण पार झाला आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, 45 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ठाणे महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 23,887 आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर 15,569 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन कर्मचारी पैकी 26,376 लाभार्थ्यांना पहिला व 12,950 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून 45 ते 60 वयोगटातंर्गत लाभार्थ्यांना 1,15,056 पहिला तर 22,262 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षावरील नागरिकांमध्ये 1,19, 338 लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 50, 659 लाभार्थ्यांना दुसरा डोस तसेच 18 वर्षावरील नागरिकांमध्ये 15,331 लाभार्थ्यांना पहिला डोस तर 940 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading