ठाणे महापालिका शाळा सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींचं आश्वासन

ठाणे महापालिका शाळा सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप माळवी यांनी दिलं आहे. अनेक महिने तुम्ही थांबला आहात, आता चार दिवसांची वेळ मला द्या. मी तुमचे सर्व प्रश्न सोडवतो, असे आश्वासन ठामपा अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ठाणे महापालिकेच्या शाळा सफाई कामगारांना दिले. त्यानंतर कामगारांनी जाहीर केलेले निदर्शने आंदोलन तात्पुरते मागे घेतलं आहे. करोनाचे कारण पुढे करत कामावर येण्यास मज्जाव केल्याने सफाई कामगारांची होणणारी उपासमार थांबण्यासाठी कामावर हजर करून घ्या, करोना काळातील वेतन आणि किमान वेतनाच्या फरकाच्या थकीत हफ्त्याची रक्कम मिळावी असे सर्व प्रश्न सोडवण्याकरिता सफाई कामगारांनी एकत्रित येऊन आंदोलन करण्याचे ठरवले होते.करोना काळात कोणालाही कामावरून कमी करू नये तसेच वेतन कपात न करण्याचे शासनाने र्निदेश दिलेले असताना उपासमार होत असल्याने आणि कामगार उपायुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत अर्ध वेतन देण्याचा निर्णय झाला असतानाही अद्याप पर्यंत एक ही रुपया वेतन देण्यात आलेले नसल्याने शिक्षण विभागाच्या सफाई कामगारांनी २५ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालया समोर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading