ठाणे महापालिका क्षेत्राचा पाणी पुरवठा उद्या रात्रीपासून २४ तास बंद

ठाणे महापालिका क्षेत्राचा पाणी पुरवठा उद्या रात्रीपासून २४ तास बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व जलवाहिनीचे तातडीने देखभाल आणि दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे उद्या रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहील. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका, मीरा-भाईंदर महापालिका, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, वागळे औद्योगिक क्षेत्राचा पाणी पुरवठा बंद राहील. तसंच पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबानं पाणी पुरवठा होईल याची नोंद घ्यावी.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading