ठाणे महानगरपालिकेचा 41 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

एकापेक्षा एक बहारदार नृत्याविष्कार, मराठी- हिंदी गाण्यांची रेलचेल, नाटिका असे विविध कार्यक्रम कर्मचाऱ्यांनी सादर करुन ठाणे महानगरपालिकेचा 41 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 1 ऑक्‌टोबर या दिवशी ठाणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा केला जातो, या दिवशी ध्वजारोहण करण्यात आले. परंतु कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा 6 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. महापालिकेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना आपली कला सादर करण्यात यावी किंबहुना त्यांच्यातील कलागुणांना वाव देता यावा यासाठी ठाणे महानगरपालिका कर्मचारी सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे उपायुक्त्‍ उमेश बिरारी यांनी सादर केलेल्या बासरी वादनास रसिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळागौर, होजागिरी नृत्य, भारतरत्न लता मंगेशकर यांना आंदराजलीपर त्यांनी गायिलेल्या गाण्यांवर त्यांना नृत्याच्या माध्यमातून आदरांली, साऊथ डान्स, जोगवा, बासरीवादन तसेच यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणारा ‘महती शिवरायांची’, शिवराज्याभिषेक, साऊथ नृत्य आदी विविध नृत्यप्रकार सादर करण्यात आले. तर कर्मचाऱ्यांनी मराठी तसेच हिंदी गीते सादर करुन या कार्यक्रमास आणखीनच रंगत आणली. या कार्यक्रमात ठाणे महापालिका मुख्यालय, दादोजी कोंडदेव स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच‍ विविध प्रभाग समित्यांमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading