ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अपघातांच्या संख्येत घट – पोलीस उपायुक्तांचा दावा

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षाच्या तुलनेत यंदा अपघातांचं प्रमाण घटल्याचा दावा ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी एका पत्रकार परिषदेत केला. ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गेल्यावर्षी ८०८ अपघात झाले होते तर यंदा याच कालावधीत ७३५ अपघातांची नोंद झाली असल्याचं काळे यांनी सांगितलं. जिल्ह्यातील एकूण १०८ अपघात स्थळांपैकी ३७ अपघात स्थळं ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं १० टक्के अपघात कमी करण्याचं उद्दिष्ट प्रत्येक जिल्ह्याला दिलं असून त्यानुसार जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अधिपत्याखाली अपघातांचं प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न असल्याचं अमित काळे यांनी सांगितलं. वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळले आणि बेशिस्त टाळली तर अपघातांचं प्रमाण ३० ते ४० टक्के कमी होऊ शकतं असंही त्यांनी सांगितलं. ठाण्यातील कोपरी पूलाच्या येथे ४ मार्गिका तयार करण्याचं काम सुरू असून ते मे २०२० पर्यंत पूर्ण होईल. पूर्व द्रूतगती महामार्गावर दोन्ही बाजूला ४-४ मार्गिका करण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या परवानग्या ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर जुना पूल तोडला जाणार असल्याचंही अमित काळे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading