ठाणे पोलीस आयुक्तालयातील ८१४ बेवारस वाहने हटवण्याबाबत ठाणे वाहतूक शाखेच्या नोटीसा

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ८१४ बेवारस वाहने हटवण्याबाबत ठाणे वाहतूक शाखेने नोटीसा लावल्या आहेत. १९ एप्रिल ते ९ मे पर्यंत रस्त्याच्या कडेला बंद पडलेली किंवा सोडून दिलेल्या बेवारस वाहनांवर ४८ तासांच्या आत हटवण्याच्या नोटीसा लावण्यात आल्या होत्या. त्यापैकी २१५ वाहने संबंधित वाहन मालकांनी स्वतःहून हटविली आणि उर्वरीत ५९९ वाहने महापालीकेच्या टोईंग च्या साह्याने हटवून डंपींग यार्ड मध्ये जमा करण्यात आली आहेत. या वाहनांमुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अधिक अरुंद होउन वाहतुक कोंडीत भर पडत होती तसेच जुन्या वाहनांमुळे परीसर अस्वच्छते बरोबरच गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांसाठी आश्रयस्थाने बनत होती. ही मोहीम भविष्यातही राबवण्यात येणार असून डंपिंग यार्ड मध्ये लावलेल्या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading