ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९५ टक्के पोलीसांचं लसीकरण पूर्ण

ठाणे पोलीस आयुक्तालयातील जवळपास ९५ टक्के पोलीसांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील जवळपास ९५ टक्के पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना पहिला तर ७९ टक्के पोलीसांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातील २ हजार १४७ पोलीसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी २ हजार ७९ पोलीस उपचार घेऊन परतले आहेत. तर ३५ पोलीसांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३४ पोलीस उपचार घेत असून यापैकी २४ गृहविलगीकरणात आहेत. लसीकरण न झालेल्या पोलीसांमध्ये बहुतांश गरोदर महिला पोलीस, स्तनदा माता आणि वैद्यकीय कारणास्तव लस न घेऊ शकलेले पोलीस आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उर्वरीत पोलीसांचंही लसीकरण पूर्ण केलं जाईल असं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading