ठाणे पूर्व सॅटिस-2 प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यत पूर्ण होणार – महापौर

ठाण्याच्या पूर्व भागात उभारला जात असलेला सॅटीस-२ हा प्रकल्प डिसेंबर २०२२ पर्यंत खुला होईल अशी अपेक्षा महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे सॅटिस 2 प्रकल्प उभारला जात आहे, या प्रकल्पाची पाहणी आज महापौर नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. त्यावेळी बोलताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. सद्यस्थ‍ितीत या प्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण झाल्याबाबत समाधान व्यक्त करीत डिसेंबर 2022 पर्यत हा प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला होणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितलं. स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटिस पूर्व 2 हा एकूण 270 करोडचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ही हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा आणि मार्गदर्शन करीत आहेत. कोविड कालावधीमध्ये प्रकल्पाचे काम ठप्प होते, परंतु अनलॉकनंतर काम पुन्हा सुरू झाले असून या कामाचा आढावा आज महापौरांनी घेतला. हा प्रकल्प सुरू असताना स्थानिक नगरसेवकांच्या सूचना विचारात घेवून त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हा पाहणी दौरा करण्यात आला असल्याचे महापौरांनी सांगितलं. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार असून वेळेचीही बचत होणार आहे. ठाणे पूर्व सॅटिस 2 या पुलावरुन टीएमटी बसेस तसंच खाजगी कंपन्यांच्या बसेसची वाहतूक होणार असल्याने ठाणे पूर्व आणि पश्चिम विभागातील वाहतुकीवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. शहरात विकासकामे होत असताना ड्रेनेजलाईन फुटणे अशा प्रकारचा त्रास होत असतो. अशा प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्यास त्या तातडीने सोडविण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading