ठाणे पूर्वेत प्राचीन युध्दकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिकं

ठाणे पूर्वतील शिवसेना मित्रमंडळानं आपल्या ५२व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ऐतिहासिक प्राचीन युध्दकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे या प्राचीन युध्दकलेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं. प्रणय शेलार यांच्या नेतृत्वाखालील १८ जणांच्या चमूनं हे सादरीकरण केलं. सादरीकरण करणा-या तरूणांनी काठी, भाला, तलवार, दांडपट्टा, तलवार पट्टा आणि दुर्मिळ वीट यासारख्या दुर्मिळ शस्त्रांचे सादरीकरण केलं. काळोख्या रात्री होणा-या मशाल युध्दानं या सादरीकरणाचा परमोच्च बिंदू गाठला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading