ठाणे पूर्वतील शिवसेना मित्रमंडळातर्फे आकाशकंदिल आणि पणती रंगवा कार्यशाळेचं आयोजन

शिवसेनेच्या ठाणे पूर्वतील शिवसेना मित्रमंडळातर्फे २२ ऑक्टोबरला आकाशकंदिल आणि पणती रंगवा या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही कार्यशाळा १० वर्ष आणि त्यावरील सर्वांसाठी खुली असून १० वर्षाखालील मुलांना आजी किंवा आजोबा किंवा आई-बाबांबरोबरही सहभागी होता येईल. या कार्यशाळेत कलात्मक कंदिल बनवणं आणि वैविध्यपूर्ण पणती रंगवण्याविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे. या कार्यशाळेसाठी १०० रूपये शुल्क असून एका कंदिलाचं सर्व सामान, दोन पणत्या आणि पणती रंगवण्यासाठी लागणारा रंग तसंच ब्रश याचा अंतर्भाव असणार आहे. अधिक माहितीसाठी ९३३३१ ५८८०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading