ठाणे नगर वाहतूक उप विभागाचे हद्दीत काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग आणि सम विषम पार्किंग व्यवस्था

ठाणेनगर वाहतूक उप विभागाचे हद्दीत शासकीय कार्यालये,  मुख्य सत्र न्यायालय, रेल्वे स्टेशन परिसर, मुख्य बाजारपेठ असून सणानिमित्त सदर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसेच ठाणे शहरातील व शहराबाहेरील नागरिकांची कामानिमित्त मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने सदर ठिकाणी दैनंदिन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या परिसरात प्रायोगिक तत्वावर वाहने लावण्यास प्रतिबंध(नो पार्किंग) तसेच सम विषय तारखेस पार्किंग व्यवस्था राबविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

            ठाणेनगर वाहतूक उप विभागाचे हद्दीत रस्त्याचे कडेला दुचाकी, चार चाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करण्यात येत असल्याने इतर वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सदर परिसरात वाहतुकीची कोंडी होवू नये, वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी खालील ठिकाणी नो पार्किंग, पी-1 व पी-2 पार्किंग व्यवस्था प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

            नो पार्किंग :- टॉवर नाका परिसर व भाजी मार्केट 100 मीटर 24 तास, टेंभी नाका ते कोर्टनाका सर्कल   150 मीटर 24 तास, पोलीस स्कूल-खारकळ आळी ते पेढ्या मारुती मंदिर जांभळी नाका 300 मीटर 24 तास, जवाहर बाग ते ए वन फर्निचर 100 मीटर 24 तास, शिवसागर हॉटेल स्टेशन रोड ते अशोक सिनेमा परिसर 100 मीटर 24 तास, चिंतामणी ज्वेलर्स गल्ली 50 मीटर 24 तास नो पार्किंग करण्यात येत आहे.

            पी-1 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळी नाका (डावी बाजू) 200 मी. परिसर 08.00 ते 14.00 वा. पर्यंत पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

            पी-2 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळी नाका (उजवी बाजू) 200 मी. परिसर 14.00 ते 20.00 वा. पर्यंत पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

            पी-1 :- मुख्य बाजारपेठ जांभळी नाका ते ए वन फर्निचर जनता फॅशन कॉर्नर (डावी बाजू) 300 मी. परिसर  विषम तारीखेस पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

            पी-2 :- मुख्य बाजारपेठ जांभळी नाका ते ए वन फर्निचर जनता फॅशन कॉर्नर (उजवी बाजू) 300 मी. परिसर सम तारीखेस पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

            पी-1 :- शासकीय विश्रामगृह, एन.के.टी. कॉलेज रोड ते मौसम साडी सेंटर (डावी बाजू) 200 मी. परिसर विषम तारखेस पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

            पी-2 :- शासकीय विश्रामगृह, एन.के.टी. कॉलेज रोड ते मौसम साडी सेंटर (उजवी बाजू) 200 मी. परिसर सम तारखेस पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

            पी-1 :- मालतीबाई हॉस्पिटल ते टेंभी नाका (डावी बाजू) 100 मी. परिसर विषम तारखेस पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

            पी-2 :- मालतीबाई हॉस्पिटल ते टेंभी नाका (उजवी बाजू) 100 मी. परिसर सम तारखेस पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading