कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील ३७ हजार ३७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी १७ लाख २० हजार २१९ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६६ लाख ४९ हजार ६३२ नागरिकांना तर ५० लाख ४४ हजार ७१६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४१५ सत्र आयोजित करण्यात आले.