ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वसुली पथकाची उत्तम कामगिरी

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वसुली आणि विक्री पथकाने उत्तम कामगिरी बजावली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील जप्त सदनिकेच्या लिलावात वरचढ बोली लागल्याने ३४ लाखांची सदनिका लिलावात तब्बल ४६ लाखांना विक्री झाली.उपनिबंधक सहकारी संस्था,डोंबिवली यांनी या मालमत्तेचे मुल्यांकन ३४ लाख केले होते. गृहनिर्माण सोसायटीचा मेंटेनन्स थकवणाऱ्या रहिवाश्यांची सदनिका सील करण्याची कार्यवाही ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि जिल्हा प्रशासनाच्या मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने संयुक्तपणे केली जाते. डोंबिवली पश्चिम येथील शिवगंगा विहार सहकारी गृहनिर्माण संस्था येथील सदनिका जप्त करण्यात आली होती. या सदनिकेचा लिलाव नुकताच शिवगंगा सोसायटीच्या आवारात करण्यात आला. उपनिबंधक सहकारी संस्था, डोंबिवली यांनी या मालमत्तेचे मुल्यांकन ३४ लाख इतके केले होते. तरीही लिलावात या मालमत्तेसाठी वरचढ बोली लागुन ही सदनिका ४६ लाखांना विकली गेली. ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हौसिंग फेडरेशनच्या वसुली आणि विक्री अधिकारी मनोज देवरे, उज्वला जाधव आणि फेडरेशनच्या संचालक शैलजा गस्ते यांच्या पथकाने सदनिकेच्या लिलाव प्रक्रियेचे कामकाज केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading