ठाणे गुन्हे शाखेनं अडीच कोटींच्या अंमली पदार्थासह २७ कोटींचा मुद्देमाल केला हस्तगत

ठाणे गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने उत्तरप्रदेशातील एमडी ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त केली आहे. २४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत पोलिसांनी आफताब मलाडा, जयनाथ यादव उर्फ कांचा, शेरबहादूर सिंग उर्फ अंकित, हुसेन सैयद या चौघांना नालासोपारा येथून अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी १४ लाखांची एमडी क्रिस्टल पावडर जप्त केली होत. या चौघांविरोधात पोलिसांनी पुढील तपास केला असता त्यांनी हे ड्रग्ज उत्तरप्रदेश येथून आणले असल्याची माहिती समजली आहे. त्यानुसार पोलिसांनी वाराणसी येथील भगवतीपुर गावात प्रदीप प्रजापती याच्या घरातील एमडी ड्रग्ज क्रिस्टल पावडर तयार करण्याचा कारखाना उध्वस्त केला. त्या ठिकाणाहून पोलिसांनी अतुल सिह, संतोष गुप्ता या दोघांना अटक केली आहे. ठाणे पोलिसांनी उत्तरप्रदेशातील फॅक्टरीतून २ कोटी ६४ लाख रुपये किमतीचे २,६४५ किलो ग्राम एमडी क्रिस्टल पावडर, एमडी बनवण्यासाठी लागणारे रासायनिक द्रवपदार्थ आणि साधन सामग्री असा एकूण २७ कोटी ८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading