ठाणे कोविड रुग्णालय लसीकरण केंद्रात दररोज ९०० ते १००० लाभार्थ्यांचे लसीकरण

ठाणे महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापकता वाढवली असून शहरातील अद्ययावत सुविधायुक्त ठाणे कोविड रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात शिस्तबद्ध पद्धतीने दररोज ९०० ते १००० लाभार्थ्यांना कोविडशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार शहरातील नागरिकांचे लसीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसोबत खाजगी हॉस्पिटलचा देखील या लसीकरण मोहिमेत समावेश केला आहे. यामधील ग्लोबल हॉस्पिटल लसीकरण केंद्रात नागरिकांच्या सोयीसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून कोविडशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लस शिस्तबद्ध पद्धतीने देण्यात येत आहेत. महापालिकेच्या केवळ ठाणे कोविड रुग्णालय येथे जवळपास दररोज ९०० ते १००० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येते. याठिकाणी एकाचवेळी ४०० नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून निरीक्षण कक्ष देखील उपलब्ध करण्यात आला आहे. नोंदणी झालेल्या नागरिकांना केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच टोकन क्रमांक देण्यात येते. शीघ्र गतीने लसीकरण करता यावे यासाठी ६ व्हॅक्सिनेटर्स आणि ६ डेटा एन्ट्री ऑपरेटर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. लसीकरणासाठी नंबर आलेल्या नागरिकांची गैरसोय होवु नये यासाठी टोकन क्रमांकाचे एलएडी स्क्रिनवर प्रेक्षपण करण्यात येते. तसेच नोंदणी नसलेल्या नागरिकांना केंद्रातून परत न पाठवता नोंदणी करून लस देण्यात येते. दरम्यान महापालिकेच्या ४३ केंद्रात आणि खाजगी १३ हॉस्पिटमध्ये आजपर्यंत २ लाख २६ हजार ५२६ लाभार्थ्याने लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading