ठाणेकरांना पुन्हा एकदा घरी राहण्याचं आवाहन करत ठाणे पोलीसांचा लाँग मार्च

कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पोलीसांनी लाँग मार्च काढून ठाणेकरांना पुन्हा एकदा घरी राहण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा लाँग मार्च काढण्यात आला. घरात रहा-सुरक्षित रहा असं आवाहन पोलीसांनी यावेळी नागरिकांना केलं. नौपाडा परिसरात अनेक ठिकाणं आहे जिथे लोकं सर्रास रस्त्यावर येत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे गल्ली बोळातून, लोकांचा जास्त वावर आहे अशा रस्त्यांवरून हा लाँग मार्च काढण्यात आला. नियमांचा भंग केला आणि विनाकारण घराबाहेर पडलात तर आता थेट जेलची हवा खावी लागेल, लॉकडाऊनचे नियम आता आणखी कठोर करण्यात आलेत त्यामुळे लोकांनी घरीच रहावे असं आवाहनही यावेळी पोलीसांकडून करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading