ठाणेकरांना उद्या ३०० सुपर बाईक्सचा आनंद लुटता येणार

गेल्या रविवारी विंटेज आणि सुपरकारचा आनंद लुटणा-या ठाणेकरांना उद्या ३०० सुपर बाईक्सचा आनंद लुटता येणार आहे. हार्ले डेव्हीडसन, दुकाटी, बीएमडब्ल्यू पासून अप्रिलिया पर्यंत अनेक दुचाकी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. ठाणे वाहतूक शाखेच्या सडक सुरक्षा आणि जीवन रक्षा या अभियानांतर्गत या दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत हजेरी लावणार आहेत. सकाळी ८ वाजता पोलीस आयुक्तांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ होणार आहे. कोर्टनाक्यापासून सुरू होणारी ही रॅली टॉवर नाका, गडकरी रंगायतन, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवास, तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, शास्त्रीनगर, उपवन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, खेवरा सर्कल, हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड मार्गे कापुरबावडी, माजिवडा, जीपीओ आणि पुन्हा कोर्टनाका येथे विसर्जित होईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading