टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन पुढील दिशा ठरवणार – राज ठाकरे

टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन पुढील दिशा ठरवणार असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरेंनी ठाण्यात येऊन अविनाश जाधवांना उपोषण मागे घ्यायला लावलं. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाण्यात पाच ही टोलनाके यांची दरवाढ झाली त्याकरिता अविनाश जाधव उपोषणला बसले होते. मी काल अविनाशला फोन करून म्हणालो उपोषण आपले काम नाही. गेली अनेक वर्ष मनसेने अनेक आंदोलने केले. 65 टोल नाके बंद केले. सेना भाजपाचा जाहीरनामा टोल मुक्त महाराष्ट्र करू म्हणून 2014 ते 2019 होता. पण कोणी प्रश्न विचारला नाही. पण मला विचारले जातात. त्याचा रिझल्ट दिसत नाही. वाहनप्रकारचे दर दुचाकी ते रिक्षा टोल नाही. बारा प्रवाशी क्षमता 40 ते 45 मिनी बस 20 प्रवाशी क्षमता. मग यात गाड्या येतात कुठे? शहरतील खड्डे इतर कर भारतात, रस्ते कर भरतात. मुख्यमंत्री यांनी पिटीशन का मागे घेतले. निवडणुकीत थापा मारणाऱ्या लोकांना जनता का मत देते. जे खोटं बोलतात त्यांना मतदान करतात. त्यांच्या विरोधात मतदानच झाले नाही, तर समजणार कसा यांना टोल हवा की नको. दोन चार दिवसात उपमुख्यमंत्री यांची भेट घेईन. नंतरच सांगू शकेल की. यावर काय झाले? काल मुख्यमंत्री यांचे अधिकाऱ्यांशी बोलणे झाले. ते ही ठाण्याचे आहेत. त्यांनाही हे परवडणारे नाही. निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीच्या वेळी, मतदानाच्या वेळी हे सगळे मुद्दे जनतेच्या डोक्यात नसतात. मुंबई-गोवा-रस्ता होणार पण नाही, अनेकांच्या जमिनी आहेत, रॅकेट आहे, चांगले रस्ते केले तर कामे निघणार नाही,असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading