टेंभीनाका परिसरात एक युवक रस्त्यावर तळमळताना आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

ठाण्याच्या टेंभीनाका परिसरात काल संध्याकाळी एक अज्ञात व्यक्ती उपचार न मिळाल्याने रस्त्यावर तळमळताना आढळली. वाडीया रूग्णालयात हा युवक उपचारासाठी आला होता परंतु उपचार न झाल्याने बाहेर पडल्यानंतर तो रस्त्यावर तळमळत पडला होता. या युवकाला कोविड-१९ची लक्षणं दिसत होती. ही बातमी कळल्यानंतर शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात फोनवरून याविषयी माहिती दिली. ठाणे नगर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तात्काळ धाव घेऊन या रस्त्यावर पडलेल्या युवकाला छत्रपती शिवाजी रूग्णालयात दाखल केले. या युवकाचे नाव शंकर यादव असून तो खोपट येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचा-यांनी या परिसराचं नंतर निर्जंतुकीकरण केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading