जिल्ह्यात आत्तापर्यंत १ हजार ६५५ कोरोनाबाधित

ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण राहिला आहे. जिल्ह्यातील काल संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीत १६ हजार २४९ सिम्टोमॅटीक रूग्ण आहेत. १ हजार ६५५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असून आत्तापर्यंतच्या अहवालानुसार १२ हजार ५२८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील मृतांची संख्या ४४ असून आत्तापर्यंत ४१० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ५६० रूग्ण असून १०७ जण कोरोनामुक्त झाले तर २१ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २५३ कोरोनाबाधित, ७६ कोरोनामुक्त तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण रूग्ण ४८४, कोरोनामुक्त ६६ तर ८ जणांना मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदर एकूण रूग्णसंख्या २०२, कोरोनामुक्त १२७ तर ७ जण दगावले आहेत. उल्हासनगर महापालिका एकूण १७ कोरोनाबाधित, २ कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडी रूग्णसंख्या २० तर २ कोरोनामुक्त, अंबरनाथ १२ रूग्ण, ३ कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू, बदलापूर ४२ रूग्ण, २१ ठणठणीत बरे झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ६५ कोरोनाबाधित, ६ कोरोनामुक्त तर आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading