टेंभीनाका परिसरातील वाहतुकीत बदल

नवरात्र उत्सव दरम्यान टेंभीनाका येथील दुर्गादेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या परिसरात वाहतूक कोंडी होवू नये, वाहतुक सुरळीत रहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त गणेश गावडे यांनी कळविले आहे.
ठाणे स्टेशन येथून सिव्हिल हॉस्पीटलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (टी. एम. टी. व एस. टी. बसेस सह) टॉवर नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने टॉवरनाका येथून डावीकडे वळून गडकरी सर्कल-दगडीशाळा चौक-अल्मेडा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
गडकरी सर्कल कडून टॉवर नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (टी.एम. टी. व एस. टी. बसेस) परफेक्ट ड्रायव्हिंग स्कुल (गडकरी सर्कल) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
सर्व वाहने, टि.एम.टी. बसेस ह्या गडकरी सर्कल-दगडीशाळा चौक मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.
चरईकडून एटलजी रोडने भवानी चौक टेंभीनाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना धोबी आळी क्रॉस येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
ही वाहने ही धोबी आळी क्रॉसपर्यंत सरळ जावून डावीकडे वळून धोबी आळी चौक- डॉ. सोनुमिया रोड- धोबी आळी मशिद सिव्हिल हॉस्पीटल मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.
कोर्टनाका बाजूकडून टेंभीनाका बाजूकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कलेक्टर ऑफीस डॉ.बाबा साहेब आंबेडकर पुतळा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
सर्व वाहने बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून डावीकडे वळून सुभाष पथने जांभळी नाका-टॉवर नाका मूस चौक- ठाणे रेल्वे स्टेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
दगडी शाळा बाजुकडुन वीर सावरकर रोड मार्गे टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना दांडेकर ज्वेजर्स यशोदिप क्लास) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
ही वाहने दांडेकर ज्वेलर्स (यशोदिप क्लास) येथून डावीकडे वळून उत्तम मोरेश्वर मार्ग अहिल्यादेवी गार्डन-धोबी आळी क्रॉस (मे.फेअर अपार्टमेंट) सरळ जावून धोबी आळी चौक- सोनुमिया रोड धोबी आळी मशिद – सिव्हील हॉस्पीटल मार्गे पुढे इच्छीत स्थळी जातील.
मिनाताई ठाकरे चौकाकडुन सिव्हील हॉस्पीटल कार्नर मार्गे टेंभीनाका व स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सिव्हील हॉस्पीटल कार्नर कडून टेंभीनाक्याकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
ही वाहने सिव्हिल हॉस्पीटल कॉर्नर – जीपीओ नाका- कोर्ट नाका-आंबेडकर पुतळा येथून डावीकडे वळून जांभळी नाका मार्गे पुढे इच्छीत स्थळी जातील.
धोबीआळी चौक – धोबी आळीक्रॉस – अहील्यादेवी गार्डन – उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्ग-दांडेकर ज्वेलर्स या मार्गे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना धोबी आळी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
ही वाहने धोबी आळी चौक – चरई टेलीफोन एक्सचेंज- एलजी रोड-एलबीएस रोडमार्गे इच्छित स्थळी जातील.
दगडी शाळा-सेंट जॉन बॉप्टिस्ट हायस्कुल (जुना मुंबई-आग्रा रोड) दांडेकर ज्वेलर्स- उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्ग – अहिल्यादेवी गार्डन धोबीआळी क्रॉस-धोबी आळी चौक- डॉ सोनुमिया रोड ते सिव्हिल हॉस्पीटल कॉर्नर या दरम्यान मधील परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजुस सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे
हरिनिवास नाक्याकडून येणारी वाहने तीन पेट्रोल पंपावरून सरळ गजानन चौक- घंटाळी देवी मंदीर रोड कडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
सर्व प्रकारची वाहने ही तीन पेट्रोल येथून वंदना क्रॉस मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील तसेच देवीचे मूर्ती विसर्जन करण्याकरीता येणारी वाहने वंदना क्रॉस येथून उजवीकडे वळण घेवून पु.ना.गाडगीळ चौक येथे डावीकडे वळण घेवून तलावपाळी विसर्जन घाटाकडे जातील.
वाहतुकीतील बदल 5 ऑक्टोबर पर्यंत अंमलात राहिल असं वाहतूक शाखेनं कळवलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading