ज्येष्ठ शिवसैनिक अनंत ( बाबू ) मालुसरे यांचे निधन

शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या खांद्याला खांदा लावून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे काम करणारे ज्येष्ठ शिवसैनिक अनंत मालुसरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ते चांगले स्पोर्ट्समन होते. तसेच वृक्षप्रेमी होते. त्यांच्या पश्चात पत्नी मीना, मुलगा सुयोग, प्रीतम, मुलगी सोनाली, सुना-जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मूळ रायगड जिल्ह्याचे सुपुत्र असलेले अनंत मालुसरे यांचे मोठे बंधू बाळकृष्ण मालुसरे हे ठाण्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेचे काम करत होते. त्यातून अनंत मालुसरे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. दिघे यांच्यासह माजी आमदार मो दा जोशी यांच्यासोबत त्यांनी काम करत शिवसेना वाढवली. यावेळी त्यांनी कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. शेवटपर्यंत ते शिवसैनिक म्हणूनच काम करत राहीले. ते उत्कृष्ट कबड्डीपटू होतेच त्याचबरोबर ते वेटलिफ्टर होते. त्यांनी राज्यस्तरावर सुवर्णपदकही पटकावले.याशिवाय उमा नीलकंठ व्यायामशाळेतून त्यांना शरीर शौष्ठ स्पर्धेत बॉडी बिल्डर पहिला ‘किताब मिळाला होता.
तसेच त्यांनी ठाणे असो या कल्याण डोंबिवली, नवीमुंबई या महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूर या सारख्या नगरपालिकांमध्ये लाखो झाडांचे मोफत वाटप केले. तसेच ठाणे शहरात झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश देण्यात त्याचा मोलाचा सहभाग आहे. ठाणे महापालिकेतर्फे वृक्षमित्र म्हणून त्यांना गौरवण्यात आले. ठाणे पालिकेकडून वृक्ष मित्र असल्याने त्यांना ठाणे गौरव पुरस्कार देण्यात आला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading