जेएनयु मधील हिंसाचाराविरोधात ठाणे महाविद्यालयात निदर्शनं

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली ठाणे महाविद्यालयात जेएनयु मधील दाव्यांच्या हिंसेविरूध्द निदर्शनं करण्यात आली. जेएनयुत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना हिवाळी सत्राच्या शैक्षणिक प्रवेशापासून रोखणा-या, विद्यापीठाची मोठ्या प्रमाणात नासधूस करणा-या, प्राध्यापकांना धमकावणा-या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले करणा-या दाव्यांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. हिंसा नको- शिक्षण हवे, लाल दहशतवाद झुगारा, जेएनयु वाचवा, डाव्या हिंसाचारापासून जेएनयु मुक्त करा, नको लढाई-हवी पढाई अशा घोषणा देत ही निदर्शनं करण्यात आली. जेएनयुतील सर्व्हर्स बंद करण्यात आले, विवेकानंदांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आला. त्याचप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर रॉड, चॉपरनं हल्ला करण्यात आला. या सगळ्याची चौकशी करावी, परिक्षार्थींना अर्ज भरू द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading