ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि हेमा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जीवन मूल्यांवर आधारित विविध स्पर्धेतील विजेत्यांना आज महापौरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. महापालिकेचा शिक्षण विभाग आणि हेमा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या शाळांमध्ये जीवन मूल्यांवर आधारित विविध स्पर्धा पार पडली. या स्पर्धेस शिक्षक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत आंचल पांडे (शाळा क्र. 7), वैष्णवी अन्नदाते (शाळा क्र. 69), सुमेशा कीर्तने (शाळा क्र. 64), योगिता मोटे (शाळा क्र.60), रिशा राम (शाळा क्र.60 ), कृष्णा कीर्तने (शाळा क्र.7) व प्रिया सिंग (शाळा क्र.60 ) यांनी तर शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये प्रणोती जाधव ( शाळा क्र. 69 ), संचिता पवार (शाळा क्र.60), डॉ. कमल गवई (शाळा क्र. 64), मो. अयाज (शाळा क्र. 63), स्मिता जाधव (शाळा क्र.7) आणि प्रियांका तानावडे (शाळा क्र.27) यांनी क्रमांक पटकाविला आहे. तसेच महापालिकेच्या शाळा क्र. 44,130,7,13, 77,101,41, 37,14 आणि शाळा क्र. 10 यांनी या स्पर्धेत विशेष कामगिरी केली. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे गोल्ड, स्लिव्हर आणि प्लॅटिनम अॅवॉर्ड देवून गौरविण्यात आले.