जिल्ह्यामध्ये पावसा पावसाचा जोरदार हाहाकार

गेला तीन दिवसाप्रमाणे आजही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यांमध्ये सरासरी 239 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक म्हणजे 332 मिलिमीटर पाऊस कल्याण परिसरात झाला आहे तर सर्वात कमी म्हणजे 160 मिलिमीटर पाऊस ठाणे तालुक्यात झाला आहे. कल्याण मध्ये 231 उल्हासनगरमध्ये 296 अंबरनाथ मध्ये 280 भिवंडी मध्ये 185 तर शहापूरमध्ये 195 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याप्रमाणे ठाणे शहरातही पावसाची जोरदार हजेरी असून गेल्या चोवीस तासात 139 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. अनेक ठिकाणी झाडे तुटला झाडाच्या फांद्या तुटला अशा घटना घडल्या आहेत. जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. नदी-नाल्यांना पूर आले आहेत. जिल्ह्यात झालेल्या या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. उल्हास नदीला पूर आल्यामुळे डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंत अनेक भागात पाणीच पाणी झाले होते. बदलापूरच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं,अनेक संग्रह संकुलांच्या अगदी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं. जवळपास हा प्रकार डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंत अनेक ठिकाणी पाहायला मिळाला. वरप गावाजवळील एक पेट्रोल पंप पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास 100 हून अधिक रहिवासी अडकले होते. या परिसरातील गाड्यांची फक्त छत पाहायला मिळत होती, इतक पाणी याठिकाणी साचलं होतं. या पावसामुळे ग्रामीण भागात अगदी हाःहाःकार उडवून दिल्याचे चित्र दिसत होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading