जिल्ह्यात १३ फेब्रुवारीपर्यंत कुष्ठ आणि क्षयरोग जागृती मोहिम

जिल्ह्यात कुष्ठ आणि क्षयरोग जागृती मोहिम राबवण्यात येत असून ही मोहिम १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. कुष्ठरोगाविरूध्दचं हे अखेरचं युध्द हे या अभियानाचं घोषणा वाक्य आहे. या मोहिमेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृतीमध्ये शाळा आणि महाविद्यालयं सहभागी झाली आहेत. त्वचेवरील ब-याच दिवसाचा फिकट आणि लालसर न खाजणारा न दुखणारा सुन्न बधीर चट्टा, कानाच्या पाळ्या जाड होणे, तळहात आणि तळपायाला सुन्नपणा, शारिरीक विकृती, तेलकट, लालसर, गुळगुळीत चमकदार त्वचा ही कुष्ठरोगाची लक्षणं आहेत. यासाठी एमडीटी ही औषधं प्रभावशील असून सर्व शासकीय आणि निमशासकीय दवाखान्यात मोफत उपलब्ध आहेत. दोन आठवड्याहून अधिक खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप, वजनात घट, भूक न लागणे, मानेवर गाठ येणे यापैकी कोणतंही एक लक्षण असल्यास संशयित क्षयरूग्ण समजावा. क्षयरूग्णांसाठी आरोग्य संस्थेत, खाजगी दवाखान्यात रूग्णाला प्रतिमहा ५०० रूपये आणि खाजगी डॉक्टरांसाठी क्षयरोगाचे निदान करून क्षयरोग केंद्रात रूग्णाची नोंद केल्यास ५०० रूपये आणि उपचार पूर्ण झाल्याची नोंद केल्यास पुनश्च ५०० रूपये, नवीन क्षयरूग्ण कळवून संदर्भित केल्यास संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात ५०० रूपये जमा केले जातात. कुष्ठ आणि क्षयरोगाची लक्षणं आढळल्यास नजिकच्या आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक संचालक आरोग्यसेवा डॉ. गीता काकडे यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading