जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण – 29 ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील 29 ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी 74 हजार ‘कोविशील्ड’ या लसीचे डोस उपलब्ध झाले असुन त्यांचे 6 महापालिका आणि ग्रामीण भागासाठी वितरण करण्यात आले आहे. 16 जानेवारीला लसीकरणास प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून 74 हजार डोस उपलब्ध झाले असून जिल्ह्यामध्ये 29 निर्देशित लसीकरण केंद्र आहेत. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात 4, उल्हासनगर 1, मिरा भाईंदर 4, भिवंडी निजामपुर 4, नवी मुंबई 5, कल्याण डोंबिवली 4, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यामध्ये 7 अशी 29 केंद्र आहेत. या सर्व ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोवीन पोर्टलवर 60 हजार 842 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. लसीकरणासाठी प्राधान्य क्रमाने गट ठरविण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी यामध्ये शासकीय, खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. ठाणे महापालिकेमार्फत 15 हजार 627, कल्याण-डोंबिवली मार्फत 5 हजार 143, उल्हासनगर महानगरपालिका 4 हजार 374, मीरा-भाईंदर 6 हजार 308, भिवंडी-निजामपूर 2 हजार 672, नवीमुंबई महानगरपालिका 17 हजार 682 आणि ग्रामीण क्षेत्रासाठी 9 हजार 36 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेस 19 हजार, कल्याण-डोंबिवली 6 हजार, उल्हासनगर 5 हजार मीरा-भाईंदर 8 हजार, भिवंडी-निजामपूर 3 हजार 500, नवीमुंबई 21 हजार आणि ग्रामीण क्षेत्रासाठी 11 हजार 500 याप्रमाणे लसीच्या डोसचे वितरण करण्यात आले आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी किमान 100 जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये 5 सदस्यांचा समावेश असणार आहे.
लसीकरणासाठी शितसाखळी तयार करण्यात आली आहे. या शीतसाखळीत प्लस दोन ते प्लस आठ डिग्री सेल्सिअस तापमानात ही लस ठेवण्यात येणार. ही लस ठेवण्यासाठी 190 आईसलाईंड रेफ्रिजरेटर तयार ठेवण्यात आले आहेत. या आयएलआरचं तापमान दोन ते आठ डिग्री सेल्सिअस असेल. तसेच 197 डिपफ्रीजरची व्यवस्था आहे. तसेच एकुण कोल्ड बॉक्स 199 आहेत. तसेच 26 हजार 530 आईस पॅक उपलब्ध आहेत. या बरोबरच जिल्ह्यात 4814 वँक्सिन कँरियर असणार आहेत. जिल्ह्यात 846 वॕक्सिनेटर, 340 पर्यवेक्षक असणार आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्पात केवळ आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.तरी लसिकरणाच्या अनुषंगाने कोणत्या चुकीच्या बातम्यांवर अथवा चुकीच्या सोशल मिडीयामधील संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading