जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान

एप्रिल ते डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 158 आहे. त्यापैकी 143 ग्रामपंचायतीं मधील एकूण 996 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान शुक्रवारी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. एकही वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या 5 आहे. पुर्णत:बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या 8 आहे. ग्रामपंचायतीच्या एकुण जांगापैकी जांगासाठी वैध नामनिर्देशपत्र अप्राप्त असल्यामुळे आणि उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही अशा ग्रामपंचायतीची संख्या 2 आहे. प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्राम पंचायतीची संख्या 143 आहे. एकुण जागांची संख्या 1472 आहे. एकही वैद्य नामनिर्देशनपत्र प्राप्त न झालेल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांची संख्या 59 आहे. माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी फक्त एकच वैद्य नामनिर्देशनपत्र उरलेल्या बिनविरोध निवडणूक झालेल्या जांगाची संख्या 417 आहे.त्यापैकी 143 ग्रामपंचायतीं मधील एकूण 996 मतदान केंद्रांवर शुक्रवारी मतदान होणार आहे. ग्रामपंचायतीची संख्या 158 आहे.एकूण प्रभाग संख्या 526 आहे.सदस्य संख्या 1472 आहे.पुरुष-160480,स्त्री-144480, इतर-2 एकूण मतदार 304962 आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading