जिल्ह्यात उद्यापासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण

जिल्हा ग्रामिण कार्यक्षेत्रात 60 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी खबरदारी डोस आणि 12 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थींच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास उद्यापासून प्रारंभ होत आहे. या मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र सरळगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र कोन, प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे आणि मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले. 12 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थीच्या लसीकरणाकरिता मार्गदर्शक सुचनांनुसार फक्त कॉर्बोव्हॅक्स लसीचा वापर करण्यात येणार असुन फक्त शासकिय कोविड लसीकरण केंद्रांवर ही लस उपलब्ध असणार आहे, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी सांगितले. या लसीचे दोन डोस लाभार्थीला 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. 1 जानेवारी 2008 ते 15 मार्च 2010 पर्यंत जन्मलेली मुले सध्या लसीकरणासाठी पात्र आहेत. तीव्र स्वरूपाच्या कोविड संसर्गापासून बालकांचे संरक्षण करण्याकरीता सर्व पालकांनी 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading