कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार सायंकाळी सातपर्यंत ४२ हजार ३२१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ६ लाख ६१ हजार ४३९ डोसेस देण्यात आले.जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६२ लाख १५ हजार ४०९ नागरिकांना तर ४४ लाख ४६ हजार ३० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४११ सत्र आयोजित करण्यात आले.