जिल्ह्यात आज २८ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील २८ हजार ८५३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २२ लाख ८० हजार ७३८ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६७ लाख ८३ हजार ७२५ नागरिकांना तर ५३ लाख ९८ हजार ७७२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९८ हजार २४१ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ४१३ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading