रेल्वेच्या मेगाब्लॉकच्या काळात परिवहन सेवेकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन

ठाणे स्थानक ते दिवा स्थानक दरम्यान शनिवार ५ फेब्रुवारी ते सोमवार ७ फेब्रुवारी पर्यंत रेल्वे प्रशासनाकडून विशेष मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे. रेल्वे विभागाकडून शनिवार रात्री दीड वाजल्यापासुन ते सोमवारी रात्री दीड वाजेपर्यत ७२ तासांचा महा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी परिवहन विभागाकडून विशेष जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी १० मिनिटांच्या प्रस्थानांतराने आणि चेंदणी कोळीवाडा ते दिवा स्टेशन या मार्गावर १५ मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात २०५ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी तसंच संचलनावर देखरेख करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, चेंदणी कोळीवाडा आणि मुंब्रा रेल्वे स्थानक येथे पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी मेगाब्लॉक कालावधीत बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading