कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री नऊपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १८ हजार ४८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २३ लाख ५८ हजार ३७७ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६७ लाख ९४ हजार ७६३ नागरिकांना तर ५४ लाख ५७ हजार १२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६ हजार ६०२ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३७४ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.