जिल्ह्यात आज १३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सुमारे १३ हजार २९६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ३० लाख १८ हजार ४४७ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ६७ हजार ४४४ नागरिकांना तर ५९ लाख ९९ हजार २२२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ७८१ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात २९० लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading