कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सुमारे ११ हजार ८१७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २९ लाख ६८ हजार ९८५ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ५७ हजार ५० नागरिकांना तर ५९ लाख ६४ हजार ५१० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ४२५ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात २७९ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.