जिल्ह्यात कोरोनाचे ७ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ७ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात २२९ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ८७८ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १ नवा रूग्ण आढळला. तर ० मृत्यू, सध्या ८५ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १२७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ० नवे रूग्ण तर ० मृत्यू, सध्या ७ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५० रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ४ नवे रूग्ण ० मृत्यू तर १०४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ४९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ० नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ६ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १ रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ४ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६५५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, ० मृत्यू, सध्या १३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७९ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या १ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५७९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १ रूग्ण, ० मृत्यू तर ३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३८८ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये ० नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ६ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading