जिल्ह्यात आज कोरोनाचे ६९३ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ६९३ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात २१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १० हजार ३१० कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार २६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ९२ हजार ७१४ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख ८ हजार २८५ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या २ हजार १६१ रूग्ण उपचार घेत असून ४२ हजार ४३२ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार १३७ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार ९३४ रूग्ण उपचार घेत असून ४६ हजार ४८८ बरे झाले तर ९९९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २ हजार २० रूग्ण असून ४० हजार ९६४ बरे झाले तर ८८५ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार १२४ रूग्ण उपचार घेत असून २० हजार ४३९ कोरोनातून बरे झाले तर ७०१ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ५४५ रूग्ण असून ९ हजार २६१ बरे झाले तर ३३५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये २३९ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार २७६ कोरोनातून बरे झाले तर ३३२ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १८४ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ६ हजार ७५५ बरे झाले तर २६२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २६८ रूग्ण असून ६ हजार ८८२ कोरोनामुक्त झाले तर ९७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ८३५ रूग्ण असून १४ हजार २२५ बरे झाले तर ५१४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading