जिल्ह्यात आज कोरोनाचे ६८९ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ६८९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत २ लाख ५५ हजार २० रूग्ण कोरोनातून बरे झाले तर ६ हजार २९६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ७ हजार ३ रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत एकूण २ लाख ६८ हजार ३१९ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात आज २०५ नवे रूग्ण सापडले ३ मृत्यू तर सध्या १ हजार ९४२ रूग्ण उपचार घेत आहेत. ५९ हजार ९९६ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज २१० नवे रूग्ण, १ मृत्यू तर १ हजार ९९९ रूग्ण उपचार घेत आहेत. ६० हजार ९७० बरे झाले तर १ हजार २०६ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १२२ नवे रूग्ण २ मृत्यू तर १ हजार ४३८ रूग्ण उपचार घेत आहेत. ५३ हजार ५१५ रूग्ण बरे झाले तर १ हजार १२६ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज ४४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ६८३ रूग्ण उपचार घेत आहेत. २५ हजार ८८४ कोरोनातून बरे झाले तर ८०४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज २२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर २०० रूग्ण उपचार घेत आहेत. ११ हजार ३७६ बरे झाले तर ३७२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ११ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ६३ रूग्ण उपचार घेत आहेत. ६ हजार ४०८ कोरोनातून बरे झाले तर ३५५ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर १९९ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. ८ हजार ३९४ बरे झाले तर ३१५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ४३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर १९९ रूग्ण उपचार घेत आहेत. ९ हजार ७५९ कोरोनामुक्त झाले तर १२७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज १३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर २८० रूग्ण उपचार घेत आहेत. १८ हजार ७७५ बरे झाले तर ५९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading