जिल्ह्यात आज कोरोनाचे २५३ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे २५३ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार २७० जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५० नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ७८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ६३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ७२८ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५३ नवे रूग्ण ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८९० जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ३९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३६० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १९ नवे रूग्ण, १ मृत्यू, तर आत्तापर्यंत ६१५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७३ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५४५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ११ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत ३६८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ८ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading