जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील पायाभुत सुविधा – आरोग्य विभाग सज्ज

राज्यात कोविड रुग्णवाढीचा वेग वाढलेला असून जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यात करोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील ग्रामीण पाच तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे कोविड रुग्णांकरिता आयसोलेशन बेडसह वार्ड कार्यान्वित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील पायाभुत सुविधांच्या तपासणीसाठी “मॉक ड्रिल” घेण्यात आले असून जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी नागरीकांना सुचना दिल्या आहेत. ६० वर्षावरील वृध्द आणि सहव्याधी असलेल्या नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी शक्यता जाणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे. ताप – खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असल्यास गावातील आरोग्य कर्मचा-यांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नयेत. जिल्हास्तरावर Antigen टेस्टिंग किट, ट्रिपल लेयर मास्क, N-95 मास्क आणि कोविड आजाराकरता आवश्यक औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. रुग्णांचे ऑक्सिजन लेवल तपासणी करीता पल्स ऑक्सीमीटर, तापमान नोंद करीत थर्मल गन पुरेशा प्रमाणात पुरवण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक कैलास पवार यांनी माहिती दिली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading