जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी जाहीर; शंभर टक्के छायाचित्रांचा समावेश – जिल्हाधिकारी

भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिका-यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातील मतदारांची एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या एकूण 61 लाख 34 हजार 955 झाली असून यादीत शंभर टक्के मतदारांची छायाचित्रे असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. जिल्ह्याच्या मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या 33 लाख 28 हजार 009 इतकी असून महिला मतदारांसाठी संख्या 28 लाख 6 हजार 93 इतकी आहे. तर 853 इतर मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील मतदारांचे लिंग गुणोत्तर प्रमाण 843 इतके आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार नोंदणीमध्ये वाढ झाली असून या यादीत 31 हजार 78 दिव्यांग मतदारांना चिन्हांकित करण्यात आले आहे. ही प्रारुप मतदार यादी विधानसभा मतदार संघ कार्यालय, महापालिका, शासकीय कार्यालयात आदी ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये काही दुरुस्ती असल्यास मतदारांनी संबंधित केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक तो अर्ज भरून आपले नाव दुरुस्त करून घ्यावे, असेही शिनगारे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सूसुत्रिकरण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण 6 हजार 391 मतदान केंद्रे आहेत. ही मतदान केंद्रे दिव्यांगस्नेही करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगितले. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान मतदारांना आधार क्रमांकाची जोडणी करणेसाठी 6-ब अर्ज भरण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आधार क्रमांक मतदारयादीतील तपशिलासोबत जोडणी करावी. यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप, एनव्हीएसपी आणि व्होटर पोर्टल या ऑनलाईन सुविधांचा वापर देखील करावा असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
मतदारयादीतील वैशिष्ट्ये
1. मतदायादीतमध्ये 100% मतदारांची छायाचित्रे आहेत.
2. संपूर्ण राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक इतर (तृतीयपंथी ) मतदार असुन त्यांची संख्या 853 इतकी आहे.
3. मतदारयादीमध्ये महिलांच्या मतदार नोंदणी वाढ. मतदायादीमध्ये लिंग गुणोत्तरामध्ये 838 वरुन 843 वाढ झाली आहे.
4. मतदारयादीमध्ये दिव्यांग मतदारांची नोंदणीमध्ये वाढ. जिल्ह्यामध्ये एकूण 31,087 दिव्यांग मतदार मतदारयादीमध्ये चिन्हांकीत.
5. ठाणे जिल्ह्यामध्ये मतदानकेंद्रांचे सुसुत्रीकरण पूर्ण. जिल्ह्यामध्ये 6391 इतकी मतदानकेंद्र अस्तित्वात आली आहेत. यापूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये 6488 इतके मतदानकेंद्रे अस्तित्वात होती.
6. ठाणे जिल्ह्यातील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी – 5569.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading