जिल्ह्यातील पर्यटनस्थळं ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

जिल्ह्यातील पर्यटनस्थळं ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. जिल्ह्यामधील धबधबे, जलाशय, धरणं अशा पर्यटनस्थळी जाण्यास जिल्हाधिका-यांनी बंदी घातली आहे. पर्यटनस्थळावर आलेले पर्यटक अनेकदा धबधब्यात, खोल पाण्यात तसंच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणं, मद्यपान करणं असे गैरप्रकार करत असतात. त्यामुळं जिवितहानी होण्याची भीती असते. म्हणून जिल्हाधिका-यांनी ठाण्यातील धबधबे, जलाशय, धरणे या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या हेतूनं ही बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading